0
4
8
3
0
0
आषाढ वारी
करुनी प्रपंच नेटका
सालभर केली तयारी,
विठू रायाच्या दर्शनाला
येंदा,जाईन आषाढ वारी.
गजर विठू माऊलीचा करू
भक्तीभावाने चालू पायी, वारी,
देईन तोच शक्ती आंतरिक
सखा सोबती,माझा हरी.
शीतलता देई तनाला
पाऊसाच्या,शीतल सरी,
भूक भागवती आत्म्याची
भावभक्तीची,ओढ न्यारी.
करू महाराष्ट्रीयन पोशाख
अभंग गाऊ माय बोलीत,
मराठी आपली मायबोली
तिचे स्थान जपू, अंतःकरणात.
समतेची घेऊ आन
प्रेमभरे,करू गळाभेटी,
सर्वं आम्ही,बहीण भाऊ
हरीनामाचा करू जयघोष, ओठी.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
0
4
8
3
0
0



