कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
प्रतिक्षा; कुसुम पाटील
0
4
8
2
8
7
प्रतिक्षा
केले जीवापाड प्रेम तुझ्यावर
कोरलं हृदयावर ओळखीची
जीवनात संसाराची वाट चालत
प्रतिक्षा केली तुझ्या येण्याची
दोन मन जुळताना आनंदात
चंद्रमेचे चांदणे मनी अंतरी
प्रीतीचे तुझे लावण्य सुंदर
मिलनाचे वातावरण पसरी
स्वप्न मनाचे होतील सोबती
तुझ्या आठवणीने करती घायाळ
तुझ्या स्पर्शाने अलवार भरे
तू किती आहेस मायाळ
गोड असेल प्रेमाची प्रतीक्षा
आठवते मजला भेट पहिली
जणू परीक्षाच होती प्रेमाची
वृक्षाच्या छायेखाली भेटली
क्षणभर विसावलेले मन
डोळ्यात डोळे पाहून
आनंदाचा उगम झाला तिथेच
आनंद व्यक्त केला गाणे गाऊन
कुसुम पाटील, कोल्हापूर
========
0
4
8
2
8
7



