जनरल वैद्य यांच्या शासकीय पुण्यतिथीसाठी नगरपालिकेस निवेदन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जनरल वैद्य यांच्या शासकीय पुण्यतिथीसाठी नगरपालिकेस निवेदन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि. ७) भारताचे माजी लष्कर प्रमुख तथा अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार
बळवंत वालेकर ३ वर्षे प्रयत्नरत आहेत. या प्रकरणी नाम. मुख्यमंत्री महोदयाँची अनुमती मिळण्यासाठी मा. जिल्हाधिकारी रायगड यांचे क्र. साधा / कार्या – १ / ब-२ / अरुणकुमार वैद्य दि. १८ / २ /२०२४ च्या शिफारशीनुसार प्रकरण मंत्रालयात प्रलंबित आहे .
सदर प्रकरणी मान. नगराध्यक्ष , नगरपरिषद अलिबाग यांची शिफारस मिळण्यासाठी निवेदन ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी मान.नगराध्यक्षा अक्षया नाईक यांना सदर केले. यावेळी समिती सदस्य अॕड. रघूजी आँ ग्रे व आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरे श पाटीलi l, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक , उपनगराध्यक्षा अॕड.मानसी म्हात्रे , माजी नगरसेवक अजय झुँझारराव तसेच मुख्याधिकारी साळुंखे उपस्थित होते .



