Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

प्रसिद्ध कवयित्री डॉ. पद्मा जाधव वाखुरे यांच्या ‘काव्यांजली’ कविता संग्रहाचे उत्साहात प्रकाशन

जिल्हा प्रतिनिधी छ संभाजीनगर

0 4 8 2 9 0

प्रसिद्ध कवयित्री डॉ. पद्मा जाधव वाखुरे यांच्या ‘काव्यांजली’ कविता संग्रहाचे उत्साहात प्रकाशन

जिल्हा प्रतिनिधी छ संभाजीनगर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजी नगर (जि.प्र.): मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने दि. ७ मे २०२५ रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह’ छत्रपती संभाजीनगर येथे ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन समारंभ व काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या भव्य प्रकाशन समारंभात प्रसिद्ध कवयित्री व शासकीय अध्यापक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पद्मा जाधव वाखुरे यांच्या ‘काव्यांजली’ कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले. सोबतच मुख्य संपादक राहुल पाटील यांनी काढलेल्या ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरुचक आमदार मा.विक्रम काळे, उद्घाटक व मुख्य आयोजक मा.डाॅ.पद्मा जाधव, शिवव्याख्याते डॉ.बालाजी जाधव, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव मा.नरेश शेळके, बुलढाणा, आयोजक ए बी पठाण, प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवयित्री स्वाती मराडे आटोळे पुणे, मराठीचे शिलेदार संस्थेचे विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे, व अरविंद उरकुडे यांच्या हस्ते एकूण २१ कविता संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.

आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, विशेषांकाच्या प्रती व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुटुंबातील श्रीमती कौशल्याबाई वाखुरे, श्रीमती छबूबाई जाधव, श्री.सोमनाथ वाखुरे, सौ. मीरा दानवे, सौ. कविता जाधव, सौ.अनिता वाखुरे, सौ. प्रीती जंजाळ, सौ. वर्षा तरटे, श्री. आशुतोष वाखुरे, सौ. ललिता वाखुरे, कु. तेजश्री, चि. कृष्णा, चि. समर्थ हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या समारंभाचे बहारदार सूत्र संचालन मुख्य परीक्षक व कोषाध्यक्ष सविता पाटील ठाकरे सिलवासा, आयोजक प्रशांत ठाकरे, सिलवासा व कवी विष्णू संकपाळ यांनी केले तर आभार आयोजक कवयित्री वर्षा मोटे यांनी मानले. याप्रसंगी राज्यातील व राज्याबाहेरील मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे