Breaking
ई-पेपरकविताकोकणपुणेसाहित्यगंध

थबकली पाऊले

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0 4 8 2 9 0

थबकली पाऊले

वळणावरती आज इथे
माझी थबकली पाऊले
विसावा मिळेल मनाला
तो शोधण्यास सरसावले

मृगजळासम सुख होते
सतत केला पाठलाग
तरी दुःखाचा ब्रह्मराक्षस
तो ऊभाच मागोमाग

कष्ट उपसले अनंत
नाही मिळाली विश्रांती
तक्रार कधी ना केली
जरी नव्हती मनःशांती

प्रत्येकाच्या सुखाचा
केला अहोरात्र विचार
स्वाभिमान जोपासला
नाही मानली कधी हार

केला सारासार विचार
माझी थबकली पाऊले
व्हावे सार्थ जीवन सारे
वरदान हेचि प्रार्थिले

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे