
0
4
0
9
0
3
व्यसन
अरे माणसा माणसा
का रे करतो व्यसन
आपुल्याच हाताने तू
का रे रचतो सरण
तुझी प्रेमळ ती आई
तीने पाजले अमृत
वात्सल्य से विसरून
डुंबला तू व्यसनात
तुझे सुंदर शरीर
नको करू तू व्यसन
गुटखा अन तंबाखून
घेशी ओढुनी मरण
अरे निष्पाप ती मुले
त्यांनी काय केलं पाप
मेली कुणाची रे माय
मेला कुणाचा रे बाप
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता.उमरेड जि.नागपूर
=========
0
4
0
9
0
3





