Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

‘मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय शब्दसुमनांजली’

कवयित्री सौ.मृदुला कांबळे गोरेगाव रायगड

0 4 8 2 8 4

‘मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय शब्दसुमनांजली’

“दादांचा जादुई संदेश म्हणजे.
आनंद आणि उत्साहाची पर्वणी,
सर्वांचा स्नेह शुभेच्छा वर्षावाने
गहिवरून येते मन क्षणोक्षणी..”

समूहात फोटोसह आपल्या नावाचे पोस्टर झळकते. आणि मग त्याखाली शब्दरूपात अत्यंत मन: पूर्वक दिलेल्या शुभेच्छा दिसू लागतात. किती प्रेम, किती आपुलकी, किती माया खरंच मन गहिवरून येते क्षणोक्षणी. आणि मी नेहमीच नि:शब्द होते…!!

मराठीचे शिलेदार ‘हायकू काव्य’ समूहात काल ‘हायकू’ चित्र बघितले आणि डोळ्यांसमोर देहातील सप्तचक्रांचे चित्र क्षणात पुढे आले. हे आज्ञाचक्राचे अर्थात् तिसरे नेत्र (शिव नेत्र) संपूर्ण चित्र दिसू लागले. आज्ञाचक्राचा बीज मंत्र “ॐ” असा असतो.

नवरात्र उत्सव म्हणजे आध्यात्मिक साधकांसाठी पर्वणीच असते.. साधक ह्या नऊ दिवसांत आपली साधना, भक्ती सिद्धीस आणण्यासाठी अखंड ध्यान आणि योगसाधना करत असतात. शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे भक्ती, शक्ती, स्फूर्ती चा अनोखा संगम. विशेष करून महिला वर्गासाठी ही खास पर्वणी असते. मला वाटते याच निमित्ताने आत्मशक्तीचा शोध घेणे गरजेचे आहे. आपल्यातच एक खास शक्ती सुप्तावस्थेत असल्याचा एकदा का बोध झाला की संकटसमयी स्वतःतील दुर्गा. काली, चंडी असे उग्ररूप धारण करता येते.

कालचे ‘हायकू चित्र’ म्हणजे त्या साधनेचा परमोच्च बिंदू अर्थात् समाधी अवस्था..असा विचार करत १७ शब्दात त्याचा सारांश लिहिण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. माझ्या हायकू काव्याला सर्वोत्कृष्ट स्थानी विराजमान करून गौरविण्यात आल्याबद्दल मी समुहाचे सर्वेसर्वा आ.राहुलदादा, आ.पल्लवीताई, आ.सविता ताई, आ.तारकाताई आ.स्वातीताई, आ.वृंदाताई आ.शर्मिलाताई,आ.प्रशांतदादा आ.विष्णु दादा, आ.संग्रामदादा सर्व परीक्षक आणि प्रशासकीय टीमचे मन:पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद तसेच सर्व ताई दादांचे ही आभार आणि खूप खूप धन्यवाद.

कवयित्री सौ.मृदुला कांबळे गोरेगाव रायगड
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे