नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत नविन मराठीच्या कृष्णराजने कमावले रौप्यपदक
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत नविन मराठीच्या कृष्णराजने कमावले रौप्यपदक
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे-दि.14 (प्रतिनिधी) पंजाब राज्यात अमृतसर येथे झालेल्या नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप या राष्ट्रीय पातळीवर खेळल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धेत पुण्याच्या नवीन मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणाऱा, कृष्णराज शेखर खाकुर्डीकर या विद्यार्थ्याने लहान गटात रौप्य पदकाची कमाई करून घवघवीथ यश संपादन केले आहे.
आयडियल तायक्वांदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट संस्थेचे टेक्निकल डायरेक्टर अजित सोनवणे यांचे या संपूर्ण स्पर्धेस विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे आयडियल क्रीडा संस्थेचे दिनेश भुजबळ आणि नीलम जवेरी यांनी खास प्रशिक्षण दिले होते.विशेष म्हणजे नविन मराठी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले विहंग भुजबळ तसेच हर्षिता मांजरेकर यांनीही मोठ्या गटासाठी रौप्य पदक पटकावले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांचे प्रोत्साहन आणि शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांचे मार्गदर्शन यामुळेच आम्ही अमृतसर येथे राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत सहभागी होत शकलो आणि आमच्या प्रशिक्षकांनी आमच्यावर विशेष मेहनत घेतल्यानेच आम्ही ये यश मिळवू शकलो, अशी भावना यशस्वी विदार्थ्यांनी व्यक्त केली. क्रीडा विश्वात या घवघवीत,यशाबद्दल शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



