Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

संविधान जागर यात्रा’; संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन

अमृता खाकुर्डीकर पुणे

0 4 8 2 8 6

संविधान जागर यात्रा’; संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन

अमृता खाकुर्डीकर पुणे

पुणे – १८ऑ(प्रतिनिधी) “संविधान जागर समिती” च्या वतीने जन सामान्यांपर्यंत संविधान पोहचविण्यासाठी संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या परंतु आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी नव्याने तयार केलेल्या काही मसुद्यांच्या उद्देशिकांचे जाहिर वाचन करण्यात आले.

या “संविधान जागर यात्रे” चे सोमवारी पुणे शहरात आगमन झाले होते. या यात्रेमध्ये आकाश अंभोरे यांनी दोन प्रकारच्या उद्देशिकांचे अभिवाचन केले. नितिन मोरे यांनी प्रास्ताविकात संविधान जागृतीची आवश्यकता सांगितली. यात्रेतील विविध विषयांचे ठराव वाचन झाले, त्यात संविधानाच्या मार्गानेच प्रगती करीत राहिल्याने आपला भारत लवकरच महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. त्यावर उपस्थितांची मान्यता घेण्यात आली.

कार्यक्रमात यात्रेचे मार्गदर्शक श्री. वाल्मीक निकाळजे यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “राज्याचे सर्व व्यवहार संविधानिक नियमांच्या अंतर्गतच व्हावे. इथले जुने कायदे सोडून आणीबाणीत नविन संविधनिक नियम स्वीकारले गेले, परंतु 100 वर्ष जुने शरीयत कायदे अजुनही संविधानाच्या विरोधात सुरू आहेत. देशाला सर्वाधिक धोका कोणत्या विचारधारेपासून आहे, ते ओळखून संविधान बदलण्याची खोटी आवई उठवणे म्हणजे संविधानाचा अनादर करण्यासारखे आहे. कार्यक्रमात संविधान जागर समितीच्या वतीने लिहिलेले “कधीच न बदलणारे संविधान व संविधान हत्येचा प्रयत्न ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच समितीच्या वतीने मागील काळात दलित वंचितांवर झालेल्या अन्यायपूर्ण घटनांच्या तपशीलवार अहवाल तयार करण्यात आला असून त्या अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागसेन पुंडगे यांनी केले. स्थानिक कार्यकर्ते चंद्रकांत काळोखे, रजनीकांत भोसले, निशांत ननावरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यात्रेच्या प्रवासातील सर्व सहकारी आणि परिसरातील नागरिक तसेच बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी व बुरुड अशा विविध समाजाचे लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. जागर गीताच्या सामुहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे