Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरदेश-विदेशनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

परीस

प्रा. दिनकर झाडे

0 4 8 3 0 0

परीस

स्पर्श होता परिसाचा
लोखंडाचे सोने होई
सज्जनांच्या संगतीत
देवपण मानवाही //१//

झाड चंदनाचे असे
सर्वांगाने अनमोल
तैसा परिसाचा स्पर्श
करी लोहा बहुमोल //२//

शोधूनही सापडेना
परिसात अवगुण
सज्जनांच्या सान्निध्यात
होई सफल जीवन //३//

सद्गुणी सुसंस्कारी
घाला जन्मास वारिस
यश पाडून पदरी
व्हा रे स्वतःच परीस //५//

ज्याचे आचार विचार
संत सज्जनां सारखे
अख्ख्या आयुष्यात त्याला
कोणी होईना पारखे //५//

प्रा. दिनकर झाडे
गडचांदूर,जिल्हा चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे