0
4
8
2
8
6
जगणे
आता जगणे
सोपे वाटायला लागले
सुख-दुखाचे मेघ
हटायला लागले
लोभ,लालसा
प्राप्ती,अतृप्ती
बाजूला सारून जीवन
थोडे नटायला लागले
जे प्राप्त
तेच पर्याप्त
हेच तत्व हळूहळू
कळायला लागले
भुतकाळाला कवटाळत
भविष्याला टाळत
वर्तमानच आता यथार्थ
वाटायला लागले
जीवन भाव-भावनांचा खेळ
कधी चुकतो,कधी बसतो मेळ
जागायचेच असते सदैव
साधत ताळमेळ नी काळ, वेळ
पंकज रामकृष्ण चारथळ
बजरंग नगर कोराडी रोड, नागपूर
0
4
8
2
8
6



