Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘युवा क्रांती’ तर्फे पुरंदर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 8 6

‘युवा क्रांती’ तर्फे पुरंदर येथे बहारदार कार्यक्रमाचे आयोजन

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे( दि २५): युवा क्रांती पुणे टीमच्या वतीने सासवड येथे विविध कार्यक्रमाचे (दि २४) आयोजन केले गेले. सकाळी 10:00 वाजता सासवड पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली. मा. ऋषिकेश पाटील – पोलीस निरीक्षक यांना युवा क्रांती संघटनेची माहिती तसेच “सर्वसामान्यांसाठी कायद्याची ओळख ” याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी सुद्धा माहिती अधिकारावर आम्हालाही लेक्चर द्यावे अशी मागणी केली.

गरजेप्रमाणे मनुष्यबळ लागल्यास तुम्हाला संपर्क करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांच्यामार्फतच पोलीस स्टेशनमध्ये आयडी वाटप कार्यक्रम झाला. 10:30 ते 11:00 चहापान करून पिंपळे येथील शाळा आचार्य प्र.के अत्रे इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. मनीषा ताई काकडे, मा. जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच मा. रागिणी ताई पाटील, निलकंठ उद्योग समूह अध्यक्ष होत्या.

त्याच बरोबर मुख्याध्यापिका मा. दळवी मॅडम उपस्थित होते. मा. जाधव सर यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. सर्वांना युवा क्रांतीची- माहिती मा. शिवाजीराव शेलार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष यांचे मार्फत देण्यात आली. मा. वसुधा ताई नाईक – राष्ट्रीय सल्लागार यांनी मुलासाठी प्रार्थना, गाणी सादर केली. याप्रसंगी या शाळेचे माजी विद्यार्थी पुरंदर तालुका अध्यक्ष मा. अमित पोमण व मा. रमेश चव्हाण पुणे जिल्हा कार्याध्यक्ष यांचे मार्फत ₹21000/- शाळेला देणगी देण्यात आली. त्याचप्रमाणे “अव्यक्त भावपत्रे” या पुस्तकाच्या दहा प्रति ग्रंथालयास भेट देण्यात आल्या. “आईचे हळवे मन” या कथा संग्रहाच्या प्रती ग्रंथालयास भेट देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा झाडांची 100 रोपे शाळेला भेट देण्यात आली. यानंतर पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पा अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तेथील प्रदर्शन पाहून परत निघालो. सर्वांनी युवा क्रांती विषयी मनोगत व्यक्त केले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये युवा क्रांतीचा एक कार्यक्रम घेण्याची सूचना आली. त्यावर विचार विनिमय करण्यात आला. “सदस्य जोडो अभियानास” प्रतिसाद देऊन संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुरंदर मधील तालुका कार्यकारणी पूर्ण करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. हॉटेलमध्ये मिसळ पावचा ( उपवासाची पण मिसळ…?) आस्वाद घेतला.श्री. अमित पोमन यांचे कार्यालयात आयडी कार्डचे विभागवार वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड परिसरातील कार्ड्स डॉ. राजेश्वर हेंद्रे यांच्याकडे देण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खालील पदाधिकारी यांची लाभली.:
डॉ. राजेश्वर हेंद्रे राष्ट्रीय संघटक
मा. शिवाजीराव शेलार – म.प्र. युवा अध्यक्ष
मा.सुरेश अप्पा गायकवाड – राष्ट्रीय सह-संघटक
मा. वसुधाताई नाईक – राष्ट्रीय सल्लागार
मा. वैशाली ताई बांगर – राष्ट्रीय मार्गदर्शक
मा. वर्षाताई नाईक – राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा
मा. दिपालीताई आंब्रे -किसान विकास महाराष्ट्र उपाध्यक्ष
मा शोभाताई हरगुडे – पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष
मा. हर्षलाताई मुलाणी – पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
मा. प्रतिभा ताई महालकर
पुणे जिल्हा अध्यक्षा
मा. राजेंद्र पन्हाळे- युवा मार्गदर्शक
मा. अमित तांबे – पुणे जिल्हा युवा अध्यक्ष
मा.शहाजी देवकर -पुणे जिल्हा सल्लागार
मा. गणेश रासकर – मावळ युवा अध्यक्ष
मा. मयूर भागवत – पुणे जिल्हा युवा संघटक
मा. सुहास तांबे – कार्याध्यक्ष
मा.विलास रोहिले – शिरूर तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत सर तसेच पुरंदर येथील नवीन सदस्य उपस्थित होते. अशा प्रकारे 27 झाडांच्या उपस्थितीत अतिशय उत्तम, नियोजनपूर्वक कार्यक्रम सादर झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे