0
4
8
2
8
6
मन
अल्लड अवखळ मन
का उदास आज,
का उतरला मनी
भावनांचा साज..!!१!!
उनाड मनातील भावनांचा
कल्लोळ हा शमला,
रोजचाच तुझा नवा
युक्तीवाद इथे थांबला..!!२!!
मिलनाचे गुपित
नको सांगू मोगऱ्यास,
गंधाळलेल्या या रानात
नको वेड्या पुन्हा बहरण्यास..!!३!!
नको शोध घेऊ
डोहातील चांदण्याचा,
नको पुन्हा तोच खेळ
उसवलेले शिवण्याचा..!!४!!
शोधू नको मज आता
पारख नव्याने तू तुजला,
किती रे खोल जखमा
या निष्पाप अंतराला…!!५!!
भावनांचा कल्लोळ आज….. शमला
श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे
जिल्हा परभणी
========
0
4
8
2
8
6



