0
4
8
2
9
0
आंदोलनाचा खेळ
होऊद्या आंदोलन कितीही,
आम्हांस ठाऊक आहे,
कोण असत त्यांच्या मागे,
आम्हांस ठाऊक आहे.
हा सर्व महत्त्व स्वतःचे
वाढविण्याचा डाव आहे,
पोळी शेकण्या राजकारणीं
लोकांना इथे वाव आहे.
मोडायचे कसे आंदोलन,
यात आम्ही पटाईत,
जनतेस बनविण्या मूर्ख,
आम्ही झालो सराईत.
दोन दिवसांचा उजेड हा,
पुढे अंधार पसरलेला आहे,
पोसलेल्या पोपटालाही
बोलण्यासाठी वाव आहे.
केसेस लावुनी फिरतील
घराकडे बिचारे आंदोलक,
कंबरडे मोडतील घासता
पायऱ्या कोर्ट–कचेरीत.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
0



