0
4
8
3
0
0
तुझी भेट….!
ओढ लागली तुझ्या भेटीची
दोघी मैत्रिणीचे अतूट नाते
मनात हुरहुर तुला भेटण्याची
तुला भेटण्याच गीत मी गाते
उत्सुकता वाढली तुझ्या भेटीची
भरल्या ताटावर उचकी लागली
भास झाला तुझ्या येण्याचा
तुझी प्रतिकृती दारात दिसली
तुझ्या विरहात देहभान विसरला
दुःखात सहभागी झाला
एकमेकांना आधार देऊन
समजून घेण्याचा प्रयत्न केला
विश्वासाचे नाते आपले अतूट
जीवनाच्या नाजूक वळणावरती
अजून आठवणी जाग्या होतात
सुखदुःखात तुझ्याच सोबती
सहवासाने जीवन माझे रंगले
प्रेमाच्या सुरांनी सप्तरंगी झाले
तुझ्या शिवाय जगणे कठीण
हृदयात जागा करून गेले
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
3
0
0



