0
4
8
2
9
0
मनातले निखारे
जाणवते अजूनही
भावनांची मज धग
त्या मनातले निखारे
आज ओकताहेत आग
मनी विषारी विचारांचा
गर्द कल्लोळ दाटलेला
तापट असा हा स्वभाव
क्रोधाने कसा झपाटलेला
हतबल पावलोपावली
स्वकीयांनीच छळले
आपले नि परके कोण
उशीराने मज कळले
मनातल्या निखाऱ्यांची
राख करुनिया टाकावी
धुमसणाऱ्या धुपटण्याची
होरपळ कायमची संपावी
देशाभिमान जागृतीने
मनातले निखारे पेटावे
प्रज्वलून राष्ट्राभिमान
भारतीय संस्कार जपावे
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जि नांदेड
=======
0
4
8
2
9
0



