Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

श्रावण महिन्यात

कविता

0 4 8 2 9 7

श्रावण महिन्यात

श्रावण महिन्यात
वसुंधरा नटली
हिरवा साज करून
नववधूपरी सजली.

श्रावण महिन्यात
निसर्गमय परिसर
चोहीकडे हिरवळ
येई सुगंध दुरवर.

क्षणात ऊनसावलीचा
खेळ चाले भूवरी
श्रावण महिन्यात
सरीमागून येती सरी.

श्रावण महिन्यात
नागपंचमीचा सण
बाल अन् बालिका
आनंदात सर्वजण.

श्रावण महिन्यात
शेत शिवारी बहर
खळाळती नदी नाले
कुठे पावसाचा कहर.

श्रावण महिन्यात
खाद्यपदार्थ पुरणपोळी
असे सणांची रेलचेल
हर्षले बांधव कोळी.

दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे