Breaking
आरोग्य व शिक्षणपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

“ज्ञानदीपाचे प्रकाशपुंज”

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 8 3 0 1

“ज्ञानदीपाचे प्रकाशपुंज”
(निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या स्मरणार्थ)

दिनांक 2 जून 2025 वार सोमवार ते 12 जून 2025 वार गुरुवारी या कालावधीत निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी आदरणीय प्राचार्य डॉ श्री दयानंद जटनुरे, श्री मिलिंद अघोर, श्री रमेश कांबळे, संदीप उंडे आणि श्रीमती सुनीता वाकुरे यांनी सुंदर असे मार्गदर्शन केले.

दहा दिवसांचे हे शिबीर,
ज्ञानाची झाली इथे नवी फळबाग,
तज्ज्ञांचा लाभ मिळाला,
आमच्या मनात जागली नवचैतन्याची लाग!

डॉ. दयानंद जटनुरे सर —
प्रेरणेचा स्रोत, विचारांचे थैमान,
शिक्षणात नवा दृष्टीकोन दिला,
साकारले परिवर्तनाचे महान दालन।

मिलिंद अघोर सर —
स्पष्टता, साधेपणा यांचे मूर्तिमंत रूप,
विषय समजावण्याची हातोटी,
मनात उमटली ज्ञानाची शुभ छाप।

रमेश कांबळे सर —
अनुभवाचा सागर, शिस्तीचा मंत्र,
त्यांच्या शैलीत होता नेमकेपणा,
प्रशिक्षणास मिळाले बळ अन् केंद्र।

संदिप उंडे सर —
ऊर्जावान आणि जोशपूर्ण मार्गदर्शक,
शिकवताना दिले आत्मभान,
जणू शिक्षक घडवणारे विचारसैनिक।

श्रीमती सुनिता वाकुरे मॅडम —
मुलायम शब्दांत गहनता दडलेली,
सहजतेनं शिकवले व्यावहारिक ज्ञान,
मनात पेरली शैक्षणिक माणुसकीची वेली।

एकत्र आले ते सारे दीप,
प्रकाशमय झाले आमचे आभाळ,
हृदयस्थ ठेऊ या गुरूंना,
जिवनभर राहो त्यांच्या शिकवणीचा वाळ!

असेच तुमचे आशीर्वाद मिळत राहोत,
शिक्षक घडवणाऱ्या तुमच्या योगदानाला आमचा मनःपूर्वक प्रणाम!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे