आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला: टोमॅटो कुरकुरे
मीनाक्षी काटकर दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
8
6
माझी पाककला: टोमॅटो कुरकुरे
साहित्य: २ मोठ्या वाट्या मैदा,पाव वाटी पिठीसाखर ,पाव वाटी तूप,१चमचा चिली फ्लेक्स, १चमचा काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ,पाव चमचा सोडा,एक चमचा जाडसर मिरेपूड, दोन मोठ्या टोमॅटोची पेस्ट,तळण्यासाठी तेल ,एक चमचा आमचूर पावडर,चाट मसाला इत्यादी.
कृती: मैदा चाळून त्यात तुपाचे मोहन व वरील साहित्य घालून घट्ट मळून घ्या.जाडसर पोळी लाटून लांब पट्ट्या कापून तेलात मंद आचेवर तळून घ्या.गरम असतानाच त्यावर चाट मसाला, पिठीसाखर, आमचूर पावडर भुरभुरावी.खाण्यासाठी तयार खट्टेमिठ्ठे टोमॅटो कुरकुरे.
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
0
4
8
2
8
6



