Breaking
ई-पेपरनागपूरविदर्भसाहित्यगंध

सौंदर्यवान रूपाली (भाग 4)

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड,नागपूर

0 4 8 2 8 7

सौंदर्यवान रूपाली (भाग 4)

एके दिवशी दुपारी सासरी घरी होते. सासरे वर्तमानपत्र वाचत होते. दोन वाजण्याचा सुमार असेल. सासुबाई शेजारी गेल्या होत्या. सासर्‍यांच्या आवाजाने “पाणी आण पाहू जरा” रूपाली. लगबगीने तांब्या आणि वाटी जवळ नेताच हात धरून ती अमंगळ मागणी सासऱ्याने केली. तशीच शेजारच्याच घरी धावत गेले सासुबाई ने विचारले “का घाबरली अशी” म्हणत होत्या पण काही न बोलता “घरी चला” म्हटले घरी आम्ही दोघे जाताच आधीच सासरे घराबाहेर पडले होते मी सुटकेचा श्वास टाकला व लगेच माझ्याच आईला कळविले की, “मला येथून ताबडतोब नेले नाही, तर मी जीव देईन” आईच्या प्रकृतीची सबब सांगून अप्पा मला घ्याला आले.ही गोष्ट माझ्या आई व त्यांनाच फक्त सांगितली. त्यानंतर मी साताऱ्याला गेलेच नाही.

रूपाली म्हणते, ‘आता मी कायमचीच माहेरी राहत होते. मयूर मधे मधे येत असे. तो काळ हसत खेळत आनंदात जाई. पण एकदाचा आमच्या करून कहाणीचा शेवट झाला. एकदा मावशी, चुलता, चुलती पाहुणे आले होते.मयूर दोन दिवस पूर्वीच आमच्याकडे आलेला होता.आमची प्रत्येकाची गादी ठरलेली होती.सकाळला गुंडाळून एकेच ठिकाणी ठेवायचो माझ्या भावाने पाहुण्याकरीता झोपण्याची व्यवस्था म्हणून गडयास सांगून गाघांची जागा बदलविण्यास सांगितली.

मध्येच रात्री मयुर लघुशंकेकरीता उठला व परत येऊन झोपला. पण कोण जाने मयुरच्या हस्तस्पर्शाने रूपालीच्या अंगात कापरे भरले दरदरून घाम आला. “कोण ते?” मामंजीचा प्रसंग क्षणभर डोळ्यासमोर आला. ‘दुधाने तोंड पोळले म्हणजे मनुष्य ताक फुंकून पितो’. मयूर माझ्या अंथरुणावर बसला होता.सर्व उठलेत जे समजावयाचे तेच सर्वजन समजले. ” मययजध उघा दिवस उजाडायच्या आधी इथून चालता हो.” अप्पा मोठया आवाजात खेकसले,ही गोष्ट मामी व मास्तरांना कळली. ते अप्पा कडे आलेत त्यांना खरी हकीकत समजली.”अरेरे ! पोराने काळे आणले!” आल्या पावली मास्तर निघून गेलेत.

मयुर परत आलाच नाही सर्वाची खात्री झाली,की तो अपराधी आहे. दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी दारावर भिकारी आला. त्याच्या अंगावर कपडयाच्या चिंध्या लोंबत होत्या दाढी वाढलेली होती, कपडे मळलेले होते. “मृणाल” असा आवाज आला. प्रथम मी घाबरुन आत गेले. मी आत गेले पण लागलीच लक्षात आले हा आवाज मयूरचा म तो परत जाण्यासाठी वळला होता मी,”मयूर” म्हणताच त्याने पाठ वळविली व दुरूनच अंतर ठेवून म्हणला, ” मी तुझा अपराधी नाही, त्या रात्री दिवा विझून गेला होता आणि आपली अंथरुणे बदलली आहेत हे मी विसरून गेलोत.मी लघुशंकेवरून आल्यानंतर कुणाला त्रास होऊ नये, या विचारात चुकीच्या गादीवर येऊन पडलो. व माझा हात तुला लागला हे सांगावयाचे होते.

अगदी लहानपणापासून मी तुझी निस्सीम भक्ती करीत आलो आहे. तुझी इच्छा केली पण तू लाभली नाहीस. कुणी काही म्हणो, तू मला पापी समजू नको श्चदेवाच्या मनात ऐवढाच आपला सहवास असावा अशा रितीनं त्याचा शेवट व्हावयाचा होता.” आणि तो रडतच निघून गेला. त्याच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे अश्रू ढाळत मी बघत होते. मामी बरोबर बोलल्यात रूपालीच्या सौंदर्याने मयूरचा अंत झाला. त्यानंतर तो कधीच इकडे फिरकला नाही. कोण जाणे कुठे असेल? असेल किंवा नाही माझे डोळे कुठे तरी शून्यात असतात. मी सुध्दा खंगून खाटेला लागले. डोळे छताकडे सदैव असतात.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे