Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

मनातलं मनाशी

दत्ता काजळे 'ज्ञानाग्रज' तुरोरी जि.धाराशिव

0 4 8 2 9 0

मनातलं मनाशी

उठ मानवा नकोच करू
करू चिंता तुझ्या भविष्याची
गुज हे मनातलं मनाशी
मनाशी वेळ ही बोलण्याची //

एकांताचा तिटकारा नको
नको राग आप्त स्वकियांचा
प्रत्येक जण व्यस्त रे इथे
इथे प्रश्न पडतो वेळेचा //

दोष नको देऊ कोणालाही
कोणालाही घालू नको गळ
मनातलं मनाशी बोलून
बोलून वाढव आत्मबळ //

तूच आहे तुझा शिल्पकार
शिल्पकार नवनिर्माणाचा
मनातलं मनाशी बोल तू
तू मार्ग काढशी संकटाचा //

ताणतणाव विसरून जा
जा विचारांच्याही पलीकडे
सकारात्मकतेचा ठाव घे
घे झेप यशोशिखराकडे……
घे झेप यशोशिखराकडे…… //

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
तुरोरी जि.धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे