0
4
8
2
8
6
वेदनेचे रंग
वेदनेचे रंग सारे ओसंडून पाहिले,
आठवू कुठवर काय काय पाहिले?
वेदनेचे रंग रंगवित आहे आजवर,
त्यातूनच नव्याने स्वप्ने ही पाहिले…
ऊन पाऊस वादळ वाऱ्यात सुध्दा,
ज्योत नवी आशेची पेटता पाहिले…
खून झाला स्वप्नांचा,चकवा दिला,
त्यातून सावरत नवी स्वप्ने पाहिले…
मीठ चोळणारे होते जे जखमेवर,
तयांनाही हार पत्करतांना पाहिले…
फुंकर घातली जखमेवर वेदनेच्या,
जखमाही सुकत जातांना पाहिले…
नाना रंग वेदनेचे आलेले जिवनी,
वळणावर आयुषा येतांना पाहिले…
बदलताच वेदनेचे रंग ते स्वकष्टाने,
नशिबाला मग बदलतांना पाहिले…
सामना तो संकटाशी पुन्हा पुन्हा,
विजयी पताका फडकता पाहिले…
- बी एस गायकवाड
पालम, परभणी
0
4
8
2
8
6



