Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सावली माझी

बी एस गायकवाड

0 4 8 2 9 0

सावली माझी

सावली माझी ही मला ऊन्हात दिसते,
झळा सोस उन्हाच्या आवर्जून सांगते..

रखरखत्या उन्हात सोबतीला असते, 
एकाकीपणा कधीच भासू देत नसते..

कधी लांबसडक कधी आखूड दिसते,
चालतांना मात्र सदा मागे पुढेच राहते..

काळोखी रात्र, अंधार असे दाटलेला,
अदृश्य रूपात तिचा सहारा भेटलेला..

शितल चांदण्या राती सोबत प्रकटते,
दिवस हे बदलतात संदेश देऊन जाते..

सावली माझी सांगून जाई खूप काही,
तावून सुलाखून निघ पर्याय ना नाही..

खडतर प्रवास जिवनाचा जेंव्हा होतो,
त्यात ही वेगळाच आनंद देऊन जातो..

सावली माझी मला प्रेरणा देत असते,
आलेली वेळ जाईल ऊर्जादायी ठरते..

सावलीकडून ही शिकलो बरेच काही,
संकट समयी संगत सोडायची नाही..

सावली माझी मज प्रकाशदायी ठरते,
जीवन जगण्याचं सार शिकवून जाते..

बी एस गायकवाड
ता.पालम,जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे