Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणसाहित्यगंध

वर्ष सरतांना

मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड

0 4 8 2 9 3

वर्ष सरतांना

वर्ष सरतांना देऊन जाते
ओंजळीत सुख-दुखाचे दान..
एक वर्ष कमी झाले आयुष्याचे
सांगते बदललेल्या कॅलेंडरचे पानं..

तोच सूर्य,तोच चंद्र, त्यांच तारका
फक्त बदलतात कॅलेंडरचे पानं..
वर्ष सरतांना सांगते क्षणभंगुर सारेच
नको करु रे मानवा इतका अभिमान..

मुठीत असलेली वाळू पडते
जशी कणाकणाने निरंतर..
असे तीनशे पासष्ट दिनरातीही
समय चक्रातून निसटता भरभर..

आनंद -अश्रुंचा मिलाफ होतो वर्ष सरतांना
आंबट-गोड आठवांचा हा जणु खजिना..
नव्या जुन्यांची पुन्हा उजळणी करताना
गहिवरते मन सरलेल्या क्षणात रमताना…

आरोग्य अन् चैतन्यमयी असो
सर्वांनाच येते वर्ष हीच मनोकामना..
सुख,समृद्धीने, समाधाने भारलेल्या
नववर्षाच्या सर्वांना खूप शुभकामना…

मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे