वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी, नंदूरबार
वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी, नंदूरबार
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नंदूरबार/ पाडळदा (दि २७ जानेवारी) पाडळदा ता. शहादा,जि. नंदुरबार येथे नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे प्रजात्ताक दिनानिमित्त आदर्श प्राथमिक तसेच वल्लभ विद्यामंदिर (माध्यमिक) यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री दत्तात्रय सोमजी पाटील तसेच व्हा.चेअरमन श्री विजय लिमजी पाटील यांचे हस्ते गणपती पूजनाने करण्यात आले.यावेळी ज्येष्ट संचालक श्री रमेश शंकर चौधरी ,रतिलाल पाटील,जगन्नाथ पाटील,अशोक पाटील,सुभाष पाटील,आदी संचालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक अंबालाल चौधरी ,पर्यवेक्षक गणेश पाटील प्राथमिकचे मुख्याध्यापक योगेश सोनार उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर
गीते,सामुहिक नृत्य,आदीवासी गीते व नृत्य,लोकगीते,बालगीत,पोवाडा,खानदेशी गीत,मोबाईलचे दुष्परिणाम वर आधारित नाट्यगीत तसेच कार्यक्रम उत्साहात सादर झाले.
कार्यक्रमासाठी दिव्या पाटील,मनिषा दाभाडे,रोहिणी सुर्यवंशी,अश्विनी पाटील,दामिणी शिंदे,सविता ठाकरे,सुनंदा पाटील,पर्यवेक्षक गणेश पाटील व
मुख्याध्यापक अंबालाल चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. अरविंद पटेल,महेंद्र पटील,भरत पाटील आदी शिक्षकवृंदांचे तसेच पुष्कर पाटील,विनोद गोसावी,योगेश पाडवी,नितिन न्हावी,दिनेश सोनार या शिक्षकेत्तर वृंदांचे सहकार्य लाभले.
चतुर पाटील व मल्हारराव ठाकरे यांनी सूत्रसंचलन केले.



