Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

धर्म शिक्षितांना रोजगार

सुधाकर भगवानजी भुरके

0 4 8 2 9 0

धर्म शिक्षितांना रोजगार

धर्म वाचवायला देतसे,बाँब दगड नि तलवार…
कुटुंब वाचवाया देईना,धर्म शिक्षितांना रोजगार…धृ

झेंडे पकडाया हवे त्यांना,दमडीत विकणारे हात…
दंगा मोर्चामध्ये अविरत, घडवून आणावया घात…
ह्या सर्व कामांसाठी ठेवती,बनवूनिया बेरोजगार…१
कुटुंब वाचवाया देईना,धर्म शिक्षितांना रोजगार…

दरबारी सिंहासनी वसे, राजकारणी आणि पुढारी…
सत्तेसाठी हपापलेले हे,करी प्रजा मताशी गद्दारी…
बनती मूर्ख जनता भोळी, नेते बनती समजदार…२
कुटुंब वाचवाया देईना, धर्म शिक्षितांना रोजगार…

आलेत कैक गेलेत कैक ,मांडूनी आमिषाचा बाजार…
लालचेचा सापळा रचून, निव्वळ खोटारडा प्रचार…
आमिषाला बळी पडतात,ते भोळे भाबडे मतदार…३
कुटुंब वाचवाया देईना,धर्म शिक्षितांना रोजगार…

जनता झाली महागाईने,जगण्यास बेहाल बेजार…
मस्तीत चूर भरती झोळी, करी स्वार्थाचाच व्यवहार…
“सुधाकरा” आंधळी बहिरी,झाली मस्तावली सरकार…४
कुटुंब वाचवाया देईना, धर्म शिक्षितांना रोजगार…

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर,नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे