0
4
8
2
9
4
किंमत नात्याची
संस्कृतीची देण आम्हा
जन्मताच नात्याच जाळं
विवीध नाती जपताना
मिळे त्यातून आत्मबळ
किंमत नात्याची व्हावी
मनातून भाव फुललेली
आपुलकी अन् पावित्र्याची
जोड देवून सांधलेली
किंमत नात्याची करेल जो
देई मानवतेला मान
विकृतीला आळा बसून
पावित्र्याचा होई सन्मान
नात्याच्या किंमतीचे प्रमाणक
आहे उत्तम संस्कार
घडण ज्याची सुसंस्कारांनी
नातेसंबंधांना देई तो आकार
श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर,अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
4



