Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

प्रत्येकाच्या मौनाचे अर्थ उलगडणारी ‘देहबोली’ ; वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

प्रत्येकाच्या मौनाचे अर्थ उलगडणारी ‘देहबोली’ ; वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण

‘देहबोली’ म्हणजे शब्दांशिवाय व्यक्त होणारी भाषा. जी आपल्या भावनांचा आणि मनोवृत्तीचा संदेश देतात. देहबोली आपल्याला इतरांच्या मनस्थितीबद्दल अंदाज बांधण्यास मदत करते आणि संवाद अधिक प्रभावी बनवते.’मानव’ हा समाजशील आहे. तो सतत इतरांशी संवाद साधत असतो. संवादासाठी आपण शब्दांचा वापर करतो, पण शब्दांपेक्षा अधिक प्रभावी माध्यम म्हणजे देहबोली होय. “देहबोली म्हणजे शब्द न वापरता आपल्या शरीराच्या हालचालींमधून, चेहऱ्यावरील भावांमधून व वर्तनातून भावना व विचार व्यक्त करण्याची कला”. देहबोलीत चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची नजर, हातवारे, उभे राहण्याची व बसण्याची पद्धत, चालणे, स्पर्श इत्यादींचा समावेश होतो.

एखादी व्यक्ती आनंदी आहे की दुःखी, आत्मविश्वासपूर्ण आहे की घाबरलेली, हे तिच्या देहबोली वरून सहज ओळखता येते. उदाहरणार्थ, हसरा चेहरा आनंद दर्शवतो, तर वाकलेली देहस्थिती न्यूनगंड किंवा थकवा सूचित करते. संशोधनानुसार मानवी संवादात शब्दांचे महत्त्व तुलनेने कमी असून देहबोलीचे महत्त्व अधिक आहे. अनेक वेळा माणूस जे बोलतो त्यापेक्षा वेगळे तो आपल्या देहबोलीतून व्यक्त करत असतो. त्यामुळे समोरच्याचे खरे भाव समजण्यासाठी देहबोली समजून घेणे आवश्यक ठरते.

देहबोलीचा उपयोग जीवनाच्या विविध क्षेत्रांत होतो. शिक्षक विद्यार्थ्यांच्या देहबोलीवरून त्यांची समज लक्षात घेतात. मुलाखतीमध्ये उमेदवाराची देहबोली त्याच्या आत्मविश्वासाचे द्योतक ठरते. राजकारणी, वक्ते, कलाकार आणि व्यावसायिक लोक प्रभावी देहबोलीच्या साहाय्याने लोकांवर चांगला प्रभाव टाकतात. सकारात्मक देहबोली माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.ताठ देह स्थिती, योग्य नजर, हसतमुख चेहरा व संयत हातवारे हे आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. याउलट नजर चुकवणे, हाताची छाती वर घडी घालणे, अस्वस्थ हालचाली किंवा वाकलेली देहस्थिती ही नकारात्मक देहबोली दर्शवते,अशी देहबोली गैरसमज निर्माण करू शकते.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यातील देहबोलीमध्ये काही सूक्ष्म फरकही लक्षात येतात. पुरुषांमध्ये देहबोली थोडी सरळ आणि स्पष्ट असते. देहबोलीचा अभाव आभासी जगात फसवणुकीसही कारणीभूत ठरतो. प्रत्यक्ष संवादात खोटेपणा देहबोलीतून ओळखता येतो. म्हणूनच आभासी संवाद करताना अधिक जागरूकता आवश्यक आहे. समोरचा माणूस आपल्याशी मनापासून संवाद साधतो का वरवर बोलतो, “देखल्या देवा दंडवत घालतो” हे त्याच्या देहबोलीतून स्पष्ट होते. देहबोलीचा योग्य अभ्यास केला पाहिजे. मौनाचे अर्थ उलगडून सांगण्याचे काम देहबोली करते. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी ‘देहबोली’ विषय देऊन आदरणीय राहुल सरांनी आपल्या बुद्धीला चालना दिली आहे. शिलेदारांनी पण स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! मला परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राहुल सरांचे मनापासून आभार.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक
सांगली जिल्हा सांगली
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे