Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

ओलावा माणूसकीचा; कुसुमलता वाकडे

नागपूर

0 4 8 2 9 0

ओलावा माणुसकीचा

अधिकारी शाळेत येणार म्हटल्या बरोबर सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांची लगबग सुरू होते. प्रत्येक शिक्षक आपली वर्गखोली स्वच्छ करायला, जाळया काढायला तर कुणी केर जाळायला, स्वच्छतागृह साफ करायला, आहार पोषण खोली, धान्य निटनिटके लावायची धावपळ सुरु आणि अधिकारी म्हटलं तर हात पाय लटपटायला लागतात त्यातल्या त्यात अधिकारी जर मुख्य कार्यपालन अधिकारी येत असल्यास काही विचारता कामा नये पण याला अपवाद ठरले ते माणूसकीचा झरा असणारे आदरणीय एस.कार्तिकेयन हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रंसगच तसा घडून आला. की हे व्यक्तिमत्त्व प्रत्येकाच्या स्मरणात चिरकाल राहतील असे.

आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलाला शासकीय नोकरी मिळणे हे एका वडिलांसाठी गदगदून येणारा ह्रदयीभाव पण….. हे सुध्दा कष्ट करुन बनियनचे छिद्र लपवणार्‍या बापाला मुलाचा आनंद पहायच्या पूर्वीचं या जगाचा निरोप घ्यावा लागला. आज गुरूवार दिनांक 27 जुन 2024 शिक्षकाचे समुपदेशन म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेला पवित्र पोर्टल मधून शिक्षणसेवक पदी रूजु होण्यासाठी आलेले जुन्नर तालुक्यातील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकावर आलेला दुःखाचा प्रंसग .

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृह गच्च शिक्षकाचे समुपदेशन म्हणून भरलेला अधिकारी पुढे बसलेले नोकरीचे गाव घेण्यासाठी आलेले हरिभाऊ याना भ्रमणध्वनीवर वडिल गेल्याची बातमी कळली हातपाय गळून पडलेत. काय करावे , कुणाला सांगावे, काही केल्या कळेना डोळ्यातुन अश्रू वाहू लागलेत. ही गोष्ट हळूवार का होईना जिल्हा परिषदेचे संवेदनशील मनाचे सीईओ एस.कार्तिकेयन यांना समुपदेशन साठी आलेल्या शिक्षकांच्या वडिलाचे निधन झाल्याची बातमी कळली. मुख्य कार्यपालन अधिकारी सभागृहाबाहेर आले त्या शिक्षकांचे सांत्वन केले धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले.स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले.तश्या आपल्या ड्रायव्हरला सूचना केल्या.

मुख्य कार्यपालन अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दाखविलेली संवेदनशीलता,माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या. म्हणून जिल्हा परिषदेचे तरुण, होतकरू, संवेदनशील मनाचे मुख्य कार्यपालन अधिकारी एस.कार्तिकेयन हे कोल्हापूर जिल्हा परिषद कडे हजर झाल्यापासून समस्त जिल्हा प्रशासनाच्या कर्तव्यातील सचोटी आणि माणूसपणाच्या ओलाव्याचा निखळ झरा आहे अशाच भावना समस्त शिक्षकांतून उमटल्या. खरोखरच अश्या हळवळ मनाच्या अधिकारीना मनापासून सलाम.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे