0
4
8
2
9
7
शब्दस्पर्श
शब्दस्पर्शांचे भुकेले
विद्यार्थी असतात
शब्द कौतुकाने मन
त्यांचे होते प्रफुल्लित
छान, शाब्बास या शब्दांनी
वाढतो त्यांचा आत्मविश्वास
शब्दसरीने मिळतो त्यांना
अध्ययनातील श्वास
शब्दस्पर्शांने होतं
विचारांच सोन
द्यावे विद्यार्थ्यांना
सुविचारच लेण
शब्दमोती लावावेत
मनाच्या कोंदणात
खुलुनी दिसेल ते
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात
शब्द मारक नसावे
शब्द तारक असावे
शब्दांची बाग फुलवावी
शब्दस्पर्शांने ती दरवळावी
प्रांजली जोशी
विरार, पालघर
0
4
8
2
9
7



