0
4
8
2
9
0
असंही घडते कधी कधी
कुठे मुसळधार पाऊस
रस्त्यावरती सुरु असतो
त्याच रस्त्यावर पुढे पुढे
पावसाचा ठिपूस नसतो…!!१!!
आठवण काढताच कधी
मैत्रीण हजर असते पुढे
कसे कळले भाव मनातील
न उलगडणारे जणू कोडे…!!२!!
जर का असले कान हलके
नक्कीच रामायण घडणार
नात्यात विनाकारण गैरसमज
आपुलकीत अंतर पडणार…!!३!!
सुख दुःखात स्नेहाचे जवळ
रक्ताचे मात्र साथ सोडतात
कोण आपले कोण परके
स्वार्थापायी संबंध तोडतात…!!४!!
जणू आगीतून फोफाट्यात
अशी जीवनाची गत होते
इकडे आड तिकडे विहीर
संकटाची मालिका येते…!!५!!
नसते ज्याची कल्पना मनी
सुख आनंद हिरावून घेते
असंही घडते कधी कधी
जणू दुःखाची भरती येते…!!६!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
0
4
8
2
9
0



