0
4
8
2
8
4
बाल शिवबा
घडविले बाल शिवबास ,
मायजिजाऊसाहेबांनीं,
युद्ध कौशल्य शिकविले
हाती घेऊन,तलवार भवानी.
धडे दिले जुलमी राजवटीला,
निकराने,शह देण्यासाठी,
स्वप्न स्वातंत्र्याचे पाहिले
स्वराज्य निर्मितीसाठी.
क्रूर अन्याय अत्याचार
नष्ट करण्यासाठी,
बाल शिवबा,लढले रनांगणी
जननीं जन्मभूमी साठी.
कर्तव्य केले असे
जे, प्रेरणादायी झाले,
आज शिवजयंतीस
सारे,विश्व नतमस्तक झाले.
केले,संस्कार बालमनावर
माँ जिजाऊ साहेबांनी,
देव, देश आणि धर्म रक्षीला
गोष्टी पराक्रमाच्या सांगुनी.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
============
0
4
8
2
8
4



