0
4
8
2
9
0
झिजलेला देह
देह पाहता चितेवरी
मनी दाह पेटला…
आक्रोशलेला हंबरडा
माझ्या मायेचा फुटला ।।
गेला म्हणे बाप तुझा
तू पोरकी आता झाली
बाप म्हणून तू आता
हाक कोणाला मारी…? ।।
धरणाचे दगड त्यांनी
अहोरात्र फोडले…
तेला मिठाला कधी
कमी नाही पडले ।।
स्वतः अनवाणी चालून
हौस साऱ्यांची भागवी
प्रमाणे नजर अवघ्या
कुटुंबावर फिरवी….।।
आयुष्यभर संसारासाठी
चंदनापरी झिजला…
झिजलेला देह कसा
सरणावर निजला..।।
कंचना मंडपे नागपूर
=========
0
4
8
2
9
0



