Breaking
अलिबागई-पेपरकोकणनागपूरमहाराष्ट्र

आगरी समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर; ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

आगरी समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबिर; ५० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि १६) : रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून जिल्हा रक्तपेढी अलिबाग यांच्या माध्यमातून आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या पुढाकाराने तसेच कच्छ युवक संघ व लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत कच्छी भवन, श्रीबाग – अलिबाग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये अपघात, शस्त्रक्रिया, गर्भवती माता, थॅलेसेमिया तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. मात्र वाढती मागणी व अपुरा रक्तसाठा यामुळे अनेक वेळा रुग्णांना अडचणी येतात. ही गरज लक्षात घेऊन आगरी समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

“Donate Blood – Save Life” या संदेशानुसार प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदान करून मानवतेचे श्रेष्ठ कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रक्तदानामुळे कोणताही शारीरिक अपाय होत नसून शरीरात नव्या रक्तनिर्मितीस चालना मिळते, असेही आयोजकांनी सांगितले.

या शिबिरात आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील, सचिव प्रभाकर ठाकूर, ज्येष्ठ सदस्य श्री जयवंत थळे, मेहुल पाटील तसेच श्री नयन कवळे, महेंद्र पाटील, भावेश पटेल यांनी स्वतः रक्तदान करून नवीन रक्तदात्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष श्री सुनील तांबडकर, खजिनदार ॲड. सचिन पाटील, उदय म्हात्रे, राजेंद्र पाटील, वैभव पाटील, मनोहर पाटील, बिपीन टेमकर, श्रेयस ठाकूर तसेच कच्छ युवक संघचे श्री धर्मेश देडिया व भावेश पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अनंत म्हात्रे, शशिकांत मिठाग्री, प्रकाश मिठाग्री, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष श्री प्रदीप नाईक, क्षात्रैक्य समाजाचे अध्यक्ष श्री कबन नाईक, उपसरपंच श्री प्रल्हाद पाटील, पत्रकार ॲड. रत्नाकर पाटील, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री तुषार थळे . सचिव विकास पाटील रायगड फोटोग्राफर असोसिएशनचेच उपाध्यक्ष समीर मालोदे खजिनदार जितेंद्र मेहता व अंकुश पाटील यांनी उपस्थित राहून आयोजकांचे मनोबल वाढवले.

या शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढी अलिबाग येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. भैरवी मालवणकर, मनोहर हाडस, जयश इदाते, वैभव कांबळे, रामकुमार निकस, स्वप्निल जगताप, पूनम पाटील, महेश घाडगे व बाबासाहेब पोटे यांचा समावेश होता. या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी ठरले, अशी माहिती आयोजकांनी दिली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे