0
4
8
2
8
4
अक्कलशून्य
उनाड वाऱ्या….
किती रे अक्कलशून्य तू
का मला असा छळतोस
अवचित येऊन पदरावर
उगाचच तयाला ढाळतो
कधी येतो माथ्यावर हळुच
कुंतल उडवतोस भुरूभुरू
कळेना तुझे हे वागणे….
अन्…
तोल माझाही लागतो ढळू
घेऊन मी गिरक्या तुजसवे
पदन्यासही होतो हळुहळू…
जन बघती चोरट्या नजरेने
उनाड वाऱ्या…..
हो ना जरा तरी शहाणा….
अन् नको शोधूस ना रे उगा
मला छळण्याचा बहाणा….
वैशाली अंड्रस्कर
तुकुम,जि.चंद्रपूर
0
4
8
2
8
4



