0
4
8
2
9
0
उणीव
उणीव धनाची नाहीच
आहे रे उपस्थितीची
कमतरता नसे वस्तूतील
स्थिती समज रित्या मनाची
वेळ कधी का थांबतो
क्षण अडखळले सावरावया
वेळ कधी का येते
गेले क्षण परतवावया
वाटून काय उपयोग
मनाची विझे न लाही
आपसूकच गार गार
भाव मारत चलते त्राही
शून्य नजरेने मग का
स्वप्न आकाशी उडते
उघड्या भावशून्य डोळ्यात
काळीज पुन्हा का फुलते
वेळे आधीच ये रे
वेळ सोबती घालवाया
अंतर वाढता ताणता
नसे धागा जोडावया
शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड, जि.बीड
0
4
8
2
9
0



