Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडासाहित्यगंध

उनाड मन; संग्राम कुमठेकर

लातूर

0 4 8 2 8 6

उनाड मन

उनाड मन अवखळ
करामती करी भारी
शेजारी बायांचा तळ
गाऱ्हाणे गाण्या दारी

उनाड मन अवखळ
भोग पाटीलाच फटके
खेळ गोट्या विटी दांडू
मित्रांशी सदाच खटके

उनाड मन अवखळ
दगडी देवालाच मारे
खेळात पराभूत होता
तोडी अकलेची तारे

उनाड मन अवखळ
चिंचा,बोरं,पेरूची बाग
तोंडाला सुटता पाणी
शिरी चोरीचा लागे डाग

उनाड मन अवखळ
तरी अंतरंगी नसे मळ
दुःख दुसऱ्यांचे पाहून
अश्रू वाहती भळभळ

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे