0
4
8
2
8
4
का टाळतोस मला
सांग ना मला काय झाले तुला
का टाळतोस मला समजेना
असा काय गुन्हा झाला
काहीच मला उमजेना
विसावल्या सावल्यांतुनी
पाऊल हे मुळीच निघेना
कितीही पाहिल्या नजारा
काळजाचे तृष्णा मिटेना
का टाळतोस मला सांग ना
असंख्य विहारांची वर्दळ
अनौकिक समाधान मिळते
फुलते आनंदाची हिरवळ
रेताळलेल्या बेधुंद काठाने
लावला लळा जिव्हाळा
उत्साही वातावरणी त्या
अनुभवला सुगंध निराळा
नजरेत न मावणारी प्रित
लावीते ओढ तनामनाला
अंतरीक लयलूट हर्षाची
बनवी खास हरक्षणाला
शांत निवांत कातर सांज
अन स्तिमित्त गंधित वारा
स्थिरावल्या मंद लाटांवर
छेडती विनीच्या मंद तारा
का टाळतोस मला आज
पुरवी प्रसन्न संधी प्रकाश
चैतन्यानुभूती देऊनी हाती
जायी दृष्टी आड सावकाश
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
===========
0
4
8
2
8
4



