
0
4
8
2
8
6
भन्नाट रानवारा
पावसाळा सुरू झाला
झालं हिरवं हिरवं रान
सुटला भन्नाट रानवारा
नाचू या बेधुंद होऊन
रानीवनी फेरफटका मारू
चला चला मुलांनो जाऊ
भरले नद्या, नाले, सागर
पावसाचा आनंद घेऊ
नाव टाकू या पाण्यात
सरसर जाईल वाहून
खेळ अमूचा आवडीचा
मनमुराद घेऊ खेळून
चहूकडे भन्नाट रानवारा
नभी सात रंगाची कमान
लाल, पिवळा, जांभळा
इद्रधनूचे रंग छान छान
सांजही ढळली आता
परतीला निघाली पाखरे
घराकडे निघू या चिंटू, पिंटू
सवंगडी आपण सारे
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
==========
0
4
8
2
8
6



