0
4
8
2
8
6
आगमन लंबोदराचे
किती वाट पाहू हे भगवंता
हर्ष होती तू येताच एकदंता
तुझ्या आगमनाने घर काय
धरती आनंदाने उसळून वाही
नावे किती बघा गणराया
लंबोदरा,सिध्देश्वर, गणपती
एकदंत मयुरेश्वरा ओमकारा
वक्रतुंड, सिध्दी विनायका
इवलेशे डोळे मोठाले कान
नाक तुझी किती लांबच लांब
पोट बघा किती पुढे आले छान
पार्वतीने दिला जन्माचा मान
दहा दिवस घरात दिवाळी दसरा
सकाळ संध्याकाळ आरती यान
बघा उसळून वाही चैतन्य वारा
घरात मोदकाचा पहिला मान
दहा दिवस कसे गेले कळले नाही
तुझ्या विसर्जनाने मन होई दुःखी
तुच भगवता सर्वाचा लाडका
पुढच्या वर्षी येशील बघते मी वाट
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
==========
0
4
8
2
8
6



