Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आगरी समाज संस्थेतर्फे शालेय पुस्तक आदान प्रदान उपक्रम

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

आगरी समाज संस्थेतर्फे शालेय पुस्तक आदान प्रदान उपक्रम

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: एक सशक्त आगरी समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबाग या एका गैर-राजकीय आगरी सामाजिक संघटनेची स्थापना समाजातील काही नोकरदार आणि व्यवसायिक लोकांनी एकत्र येऊन केली. अलिबागमध्ये उच्च दर्जाच्या आगरी समाज सभागृहाची निर्मिती आणि तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी जागरूक करून संधी उपलब्ध करून देणे ही प्रमुख उद्दिष्टे संस्थापकांनी ठेवली आहेत. सदर संस्था मा जिल्हा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत झाल्यावर आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभासद नोंदणीला सुरुवात झाली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सौ सुलभा नरेश पाटील, वय वर्ष 78, संस्थेच्या पहिल्या आजीव सभासद झाल्या. तसेच पहिल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी झाली.

यासोबतच संस्थेचा पहिला उपक्रम शालेय पुस्तक योजना जाहीर केली गेली. विद्यार्थ्यांच्या शालेय परिक्षा लवकरच संपतील. शालेय पुस्तके एकतर रद्दीत दिली जातील किंवा बुक स्टॉलवर विकली जातील. परंतु जर एकमेकांची पुस्तके exchange केली तर आपली पुस्तके कोणाला तरी कामाला येतील आणि पाहिजे असलेली पुस्तके जर उपलब्ध झाली तर मिळून जातील. त्यामुळे पालकांना होणारा शैक्षणिक भुर्दंड काही प्रमाणात कमी होईल व नकळत निसर्गाचे संवर्धनसुद्धा होईल.

यासाठी आपल्या जवळ जी शालेय पुस्तके आहेत ती आमच्या कलेक्शन सेंटर मध्ये जमा करा आणि तुम्हाला जी पुस्तके हवी आहेत त्यांची यादी आम्हाला व्हॉट्स ॲप करा अथवा फॉर्म भरून द्या. म्हणजे उपलब्धतेनुसार मागणीची संस्थेला पूर्तता करता येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील (9527308133), उपाध्यक्ष श्री सुनिल तांबडकर (9822603856), सचिव श्री प्रभाकर ठाकूर (9850297599) आणि मनोहर पाटील (8329697636) यांनी दिली.

अमूल्य पुस्तके रद्दीत जाऊ नयेत म्हणून संस्थेतर्फे एक प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ह्या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळेल तसेच जास्तीत जास्त समाजबांधव आमच्या कार्यामध्ये सहभागी होतील अशी आशा आगरी समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाने व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे