ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
संघर्षगाथा
पांडुरंग एकनाथ घोलप मु.पो.रोहोकडी, ता.जुन्नर, जि पुणे

0
4
8
2
9
7
संघर्षगाथा
आयुष्याची संघर्षगाथा माझी
स्वतःच लिहिन म्हणतो
किती अघोरी वार सोसले
देहाचा कण कण कण्हतो
आयुष्याच्या वाटेवर संपूर्ण
फक्त संघर्ष पेरला होता
चिंता, व्यथा जाणिवांनी
क्षण हरेक घेरला होता
संघर्ष होता जरी पाठीशी
नाही केली कधी तमा
धीरोदात्त लढवय्या बाणा
बाळगले नित्य संयमा
प्रत्येक टप्प्यावर आयुष्याने
दिले खडतर अनेक धडे
फिरलो ना माघारी परंतू
ना पडले कधी साकडे
यशोशिखरी विराजमान मी
आठवतो जुनाच संघर्ष
होतो वेदनांचा अजूनही
मला आगंतुक स्पर्श
पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो.रोहोकडी,
ता.जुन्नर, जि पुणे
0
4
8
2
9
7



