Breaking
ई-पेपरनागपूर

महाकाली नगर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

0 4 8 2 8 6

महाकाली नगर चौकात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २०) माँ जिजाऊ प्रतिष्ठान किशोर पवार महाकाली नगर चौक यांच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात (दि १९) महाकालीनगर चौकात पार पडला. राजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सर्वप्रथम नवनिर्वाचित नगरसेवक बाबाराव तायडे तसेच मॉ जिजाऊ डेअरीचे संस्थापक किशोर पवार यांच्या नेतृत्वात माल्यार्पण व आरती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दक्षिणचे आमदार श्री मोहनभाऊ मते यांच्या अध्यक्षतेत पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर हिंदू एकता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष स्वप्निल दादा साळुंके व सुनील मानेकर यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन शाहू पवार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवकालीन युद्ध कलेचा प्रदर्शन तलवार, दानपट्टा, लट आणि भाला याचे मोरेश्वर भाऊ व विकास हिंगे यांच्या मार्गदर्शनात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी वस्तीतील सर्व नागरिकगंण, महिला मंडळी, युवक आणि युवती मंडळी सर्व गणमान्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात चिमुकली सानवी टिक्कस झांशीची राणी या वेशभूषेत होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर सपकाळ, शाहू पवार, भूषण टिक्कस, सही पवार, दीपक लाडसे, गजू जाधव, अनुराग धारपुरे, मनीष काटोले, गजानन गायकवाड, नितेश वानखेडे, आकाश काळे, सचिन शिंदे, दिनकर गोतमारे, धनराज काटकर, अतुल माने, प्रदीप गणोरकर, किशोर बुराडे, अजय रामगीरकर आणि देवरावजी प्रधान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन दीपक खेडकर यांनी तर आभार सौ. चंदाताई पवार यांनी मानले. सर्व पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार किशोर पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे