Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील कविता

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : अर्पण🥀*
*🍂बुधवार : २३/ एप्रिल/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अर्पण*

माणसाला आनंदाने, जीवन जगता यावे।
आयुष्याच्या संध्याकाळी,हसून मरता यावे।।

जीवनाचे पानगळीने,निष्पर्ण होता होता।
ओलावा मुळात ठेवून,इथे गळता यावे।।

रुसवे फुगवे नको,कुणाशी वैरी भावना।
प्रेमाने सारं जिंकून,ह्रदयी जपता यावे।।

ईथे तिथे बसायला,ती नसावी उठाठेव।
शोभून चार चौघात,कुठेही बसता यावे।।

एवढे घडू दे प्रभू,जे लाभले ते जीवनी।
ईतरांना भल्यासाठी,*अर्पण* करता यावे।।

जगून जीवन धन्य होता,म्रुतुला सांगणे।
माणूसकीच्या साक्षीने,स्मशानी जळता यावे।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

कितीतरी दिवसांनी
अचानक भेट झाली
माहेराची आठवण काढत
घरी घेऊन गेलीस..
तूही किती लगबगीने
आगतस्वागत केलं
भरलेले तुझं गोकुळ पाहून
मन माझं भरून आलं..
सुखी आहेस तुझ्या जीवनी
समजलं गप्पाटप्पा करत
माघारा मी निघालो तेथून
समाधानाचा श्वास भरत..
हळूच तेव्हा तू विचारलं
कसं आहे माझं जग
काय सांगणार होतो तुला
जगतो आहे एकटा भणंग..
अधरांनी माझ्या
नव्हतं मौन सोडलं
तरीही तू सगळं
शब्दावीण ताडलं..
तुझ्यामुळे वाट्याला
आलं हे एकाकीपण
हळहळली मनात
होता भूतकाळाचे स्मरण
पापणीआड एक अश्रू
केलास तू अर्पण
किती दिलेस अनमोल दान
फिके वाटले सगळे धन..
अर्पिलेला तो चुकार अश्रू
आता मजला स्मरत आहे
उरली ना कुठली वेदना
ओठी हास्य फुलत आहे
कुणीतरी आहे
मजसाठीही हळहळणारं
हेच अंतिम श्वासासमयी वाटे
अतीव सुख देणारं..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

हात हाती तुझ्या देऊनी
नयनी रूप तव् वसलेले
अंतरीच्या भाव भावना
माझिया मनात ठसलेले

प्रीतवेडी तुझी रे सख्या
तूच माझे आयुष्य दर्पण
सोबत राहील जीवनभर
सर्वस्व तुज करते अर्पण

सुखदुःखाच्या वाटेवरती
सदैव साथ राहील माझी
असेल जोवर प्राण देही
काळजी मी घेईल तुझी

अर्धांगिनी तूज देते ग्वाही
अतूट नाते जपून प्रेमाचे
आयुष्याच्या वळणावर
डगमगतांना सावरण्याचे

नसतांना घरात मी कधी
उणीव ही तुज भासावी
ध्यानीमनी सदैव तुजला
माझीच प्रतिमा दिसावी

सखी,प्रियसी,सहचारिणी
दिसेलही माझ्यात तुजला
करते अर्पण माझे तनमन
समर्पण भावनेने प्रीतफुला

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि २५/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अर्पण*

कुणी म्हणतात देव नाही
ज्याला देव कुठे कळतो
हि सृष्टी कोणी निर्माण केली
सृष्टीचा रचेता सर्व काहि देतो

मानव जन्माला आलाय
सोबत काय घेऊन आलात
या धरतीवर पाहुना बनुन आला
तरी किती अंहकार त्याच्यात

देव म्हणतो मी जे निर्माण केल
मी जे झाड लावल फुल उगवले
तेच पुष्प तोडुन मला वाहतात
जे तुमचे नाही ते स्वतःचे वाटले

ईश्वर म्हणतो मला काही नको
तुम्हाला जे द्यायचे आहे तर
अंहकार लोभ क्रोध ईर्शा
अर्पण करा माझ्या चरणावर

*सौ पुष्पा डोनीवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

इथे आहेच काय माझे,
सारे तुझे तुलाच अर्पण
इथून घेतो इथेच देतो,
हे केवळ शुद्ध समर्पण.//

तुझ्याच. कृपेने केलाय
मी हा मानवी देह धारण
मी केवळ निमित्तमात्र
सर्वस्वी तूच कर्ता कारण

गर्भवासात निर्मिले मन
मेंदू, ह्रदय, हस्त, चरण
केवळ एका नाळेद्वारेच
तूच केलेस उदरभरण.. //

हाडामांसाच्या पुतळ्यात
तूच ओतलेस पंचप्राण
तान्ह्यासाठी माते उदरी
तूच केला पान्हा निर्माण.. //

बल,बुद्धिने परिपूर्ण केले
पंचेंद्रियाचे सक्षमीकरण
घडवण्या मला केले तूच
पंचतत्वाचे एकत्रीकरण.. //

आता देवा तुझेच रहावे
पंचविकारावरही नियंत्रण
दिले जाऊ नये मजकडून
कधी अहंकारास आमंत्रण.. //

अंती मुक्तीचे द्वार खुलू दे
टळावे जन्ममृत्यूचे भ्रमण
साफल्य व्हावे या जन्माचे
होण्यापूर्वी. प्राणोत्क्रमण.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

हरित धरणी ! माता प्रियतम !!
श्रद्ध्भक्ती भावम् ! अर्पणम् !!

मात् पीत् तूच! देशा प्रियतम !!
भाव सुमनम ! अर्पणम्!!

राखट कठिण! महाराष्ट्र धर्म !!
साष्टांग चरण ! अर्पणम् !!

ज्ञानगुणवंत !भूमी महंतम !!
पुण्यभूवंतम् ! अर्पणम् !!

ज्ञानयोगी संत ! कर्मयोग शास्त्र!!
शरणांग मित्र ! अर्पणम् !!

शौर्य शिवशंभो! क्षत्रिय विरम !!
धर्मरक्षार्थम ! अर्पणम्!!

बळीराजा कष्टे ! शितल उष्णम!!
कार्यनिर्धारण् ! अर्पणम्!!

*शर्मिला देशमुख -घुमरे ,बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

जल अर्पण करतेय..
सूर्यदेवा..तुजला..
सुख समृद्धीचा…
आशिष दे मजला..
आज मात्र सूर्यदेव
निरुत्तर होते..
मलाही म्हणवेंना..
आता मी निरोप घेते..
नजरेला नजर…
भिडणार नव्हती..
कारण तेजोमय लाली..
तप्त होत आली होती..
पण हळूच म्हणाले..
काय रोज करतेस..
जल अर्पण मजला…
कधी वाटीभर पाणी पाखरांना..
ठेवावे ना वाटले तुजला…
जसा भाव तुझा..
माझ्याप्रति वाटतो..
पण मुक्या जीवांना बघून
कंठ माझाच दाटतो…
माझ्या उष्ण तापमानाने…
लाहीलाही त्या जीवांची होणे..
मी ही लाचार,नियम कर्माने
अंधरल्या सृष्टीस प्रकाश देणे..
तू तर निभवावा मनुष्यधर्म..
नको यापुढे हे शरीर कर्म…
कर तुझा निस्वार्थ भाव अर्पण..
अखेर ह्या देहाचा साथी सरपण..
अखेर ह्या देहाचा साथी सरपण..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

व्हावे जीवन सुंदर
म्हणून अर्पण केले
श्रद्धापूर्वक देवाला
भोग दान हार फुले …

करा अर्पण भोजन
वस्त्र दान गरिबाला
असे दान स्वइच्छेचे
मनशांती मिळण्याला ….

सर्वस्व अर्पण केले
देशासाठी आले पुढे
म्हणून स्वातंत्र्य फळे
चाखत चाललो पुढे ….

सहयोग आंदोलना
उघडा शासन डोळे
उद्धिष्ट पूर्ण करण्या
यावे लागेल सगळे ….

अर्पण करतो देह
निसर्ग मातेला जेव्हा
जातो प्राण देहातून
अंत श्वास घेतो तेव्हा ….

*डॉ. बालाजी राजुरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

सर्वस्व केले अर्पण आता तेच छळते
ते स्वप्न ही आता दूर दूर पळते

नाही बाळगली तमा लोक काय म्हणतील
उशीरा का होईना आता ती दुनियादारी कळते

कोणती केलीस जादू कि मनकवडा तू
नकळत पाउल पुन्हा त्याच वाटेवर वळते

मी सारखी दग्ध ऐन यौवनात आता
सांग आता दूर राहून तुला काय मिळते

चूक म्हण तारुण्याची कि आणखी असेल काही
भेट ना एकदा तू पाया मी पडते

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

कुणी कुणी या धरतीवर,
सांगा काय केलेत *अर्पण*…
जरी कुणी सांगितलं नाही,
तरी सांगून जाई दर्पण…१

बंधूभाव मानवता धर्म,
पाळायचा असतो मानवा…
सोंग करूनी ढोंग रचूनी,
पेटवायचा नसतो वणवा…२

सलोख्याचे संबंध जपावे,
एक दुजा सहाय्य करावे…
विसरू नका मंत्र नाजूक,
मनामनात प्रेम रूजावे…३

तन मन धन करा *अर्पण*,
मनामनात स्नेह जपावा…
*सुधाकरा* जन्मोजन्मीचा रे,
ऋणानुबंध प्रेमे जपावा…४

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे