Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

‘काव्यज्ञानाची ही शिदोरी अनमोल ठेवाच’; सिंधूताई बोदेले

कवितेवर बोलू काही

0 4 8 2 8 6

काव्यज्ञानाची ही शिदोरी अनमोल ठेवाच’; सिंधूताई बोदेले

कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी कष्ट करणारे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी, टिकवण्यासाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा श्री राहुल पाटील सर यांचे फार आभार मानते.

या कार्यक्रमात जरी कविता सादर करता आली नाही. तरीही फार मोठी शिदोरी आम्हाला या कार्यक्रमातून मिळालेली आहे. मार्गदर्शनपर भाषण करणारे वक्ते खरंच फार ग्रेट आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग पुढील आयुष्यासाठी कवितेच्या समृद्धी करण्यासाठी नक्कीच होईल.

आम्हाला ही संधी सरांनी वारंवार उपलब्ध करून द्यावी असे मला वाटते .कविता सादर करण्यापेक्षा कविता म्हणजे काय त्याचे बारकावे सांगणारे आणि कविता समृद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी ज्ञान देणारे लोकांची फार आवश्यकता असते आणि ते या कार्यक्रमात मिळाले फार फार धन्यवाद सर.

ही जी ज्ञानाची शिदोरी असते ती “सरतही नाही आणि पुरतही नाही” असे म्हणतात खरंच ती कधीही सरत नसते आणि जितकी मिळाली तितकी कमीच असते जितके ज्ञान जितके घ्यावे तितके कमीच असते म्हणून ती पुरतही नाही असे म्हणतात. कविता करणे आणि त्या दर्जेदार करणे यात फार फरक असतो उगाच ट लां ट लावणे..म्हणजे कविता नव्हे . कविता कशी असावी ती कशी लिहावी तिथे काय निकष आहेत याची संपूर्ण माहिती अध्यक्षस्थानी असणारे भोयर सर यांनी दिली.

तसेच इतर मान्यवरांनाही फार मोलाचे मार्गदर्शन केले. प्राजक्ताई खांडेकर यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन फार सुंदर रीतीने झाले त्यांच्या पुस्तकावर बोलताना सरांनी फार मोलाचे मार्गदर्शन दिले. अशी ही शिदोरी घेऊन आम्ही मराठी दिनाचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला आणि आम्हाला छान छान बोधामृत मिळाले .त्याबद्दल राहुल पाटील सर यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर. अशीच मेजवानी वारंवार मिळत राहो ही आशा ठेवून माझी दोन शब्दांना मी विराम देते. पुनश्च धन्यवाद.

कवयित्री सिंधू बोदेले
ता रामटेक जि नागपूर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे