उमरेड येथे बिरसा मुंडा जयंती.
रजत डेकाटे- प्रतिनिधी
उमरेड/मालेवाडा
उमरेड येथील भिसी
नाका चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ क्रांतिकारक बिरसा मुंडा तसेच लहु वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी
उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या हस्ते क्रांतिकारक बिरसा मुंडा व लहु वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी आदिवासी बांधवांनी रॅली काढली होती. रॅलीत बिरसा मुंडा की जय असा जयघोष आदिवासी नागरिकांनी केला.इतकेच नव्हे तर रॅलीत आदिवासी नृत्यांची जुगलबंदी करण्यात आली.
कोयतुर महासभा संघ, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन, बिरसा ब्रिगेड, फासे पारधी संघटना यांनी यावेळी सहभाग नोंदविला होता.
यावेळी रामदास एडस्कर,सुरज येल्ले,विजय मेश्राम, परमेश्वर ऊईके,पवन मडावी, मंगेश कोकाटे, नंदकिशोर कोकोडे, श्रीराम कुंभरे, संतोष पेंदोर, आशिष कुळमते , गणेश जाधव, गणेश पवार, मारोती मसराम, मोरेश्वर गेडाम, चंद्रशेखर उईके, विक्की जुगनाके, वंश नैताम, अक्षय टेकाम, शेषराव टेकाम, शेखर पंधरे, सुनील कन्नाके,प्रकाश कोवे यांची उपस्थिती होती.



