Breaking
कोकणमहाराष्ट्रमुंबई

सैनिक निधीसाठी अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांचा एक लाखाचा धनादेश !

वाढदिवस व कारगिल शहीद दिनाच्या निमित्ताने निभावले सामाजिक दायित्व

0 4 8 2 9 0

सैनिक निधीसाठी अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांचा एक लाखाचा धनादेश !

वाढदिवस व कारगिल शहीद दिनाच्या निमित्ताने निभावले सामाजिक दायित्व

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग – महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस सचिव अ‍ॅड. प्रविण ठाकूर स्वतःच्या वाढदिवसी देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त गेली १८ वर्षे सैनिक कल्याण निधीसाठी भरघोस आर्थिक मदत करतात त्याप्रमाणे यावर्षीही त्यांनी एक लाख रूपयाचा धनादेश रायगडच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सुपूर्द केला. कारगिल शहीद दिनाच्या निमित्ताने ऍड.प्रवीण ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शहीदांना आदरांजली वाहिली.

यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र काँगेस प्रदेशचे रायगड प्रभारी श्रीरंग बर्गे, तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, ले.कर्नल राहुल माने (नि), युनूस शेख, सहा.सैनिक अधिकारी, बळीराम म्हात्रे, सुभेदार नथुराम गोठल, ॲड.विजय साईनी,ॲड.स्नेहा रावकर, ॲड. अश्विनी होळकर, ॲड.प्राजक्ता सिनकर, ॲड.भावेश मयेकर, ॲड.विद्धेश गोंदकर, ॲड.हिना तांडेल, महेंद्र म्हात्रे उपस्थित होते.

देशाच्या सिमांच्या रक्षणासाठी वादळवारा, पाउस, कडाक्याची थंडी अशा सर्व समस्यांना तोंड देवून कार्यरत असणा-या जवानांप्रति अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांची सैनिकांना सहायता करण्याची ही कृति संपूर्ण तरूण वर्गासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी मार्गदर्शक असल्याची भावना यावेळी प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी बोलून दाखविली.

सैनिकांच्या कुटुंबियासाठी, अपंग सैनिक, विधवा पत्नी, शहिदांचे आई-वडील व परिवारांसाठी या ध्वजदिन निधीचा उपयोग केला जातो. महाराष्ट्र शासन व सैनिक कल्याण विभाग यांच्यामार्फत या निधीचा विनीयोग होतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे