Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणसाहित्यगंध

माझी झोपडी

सौ. सुरेखा रा.चित्ते

0 4 8 2 9 7

माझी झोपडी

मी राहतो शहरात
फ्लॅट च्या घरात
बिल्डिंग चार मजली
चढताना येते खुजली

पावसाळ्यात पाणी तुंबते
त्यामुळे शाळा बंद होते
करावी लागते लोकलची वारी
ही मुंबई लय भारी

खाण्याची येथे मज्जा
पैश्याचा उडतो फज्या
धावपळ ईथे सवईची
कसरत होते आईची

आली माझी झोपडी
दारात आहे कोंबडी
ऊंच नारळ उभा दारात
सवंगड्याची आली वरात

झोपडी गवताची
आहे मोठ्या मायेची
उन्हाळ्यात थंडगार गारवा
परसात गातोय पारवा

सौ. सुरेखा रा.चित्ते
श्रीवर्धन जि. रायगड

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे