
0
4
8
2
8
6
श्रावणधारा
रिमझीम श्रावणधारा
आभाळाचा रंग बावरा
तृणपात्यांचे रूप देखणे
अलवार छेडतो ओला वारा…
डोंगरमाथा कडेकपारी
दुधाळ लाटा रानोरानी
दुथडी भरुन वाहते सरिता
गातं गातं ती सृजन गाणी…
नभोमंडपी मेघ वल्लरी
जल होऊनी झरझर झरते
अवनीवरती हिरवाईचे
दान अनोखे देऊन जाते…
काळोखात वीज चमकली
ढोल ढगांचा वाजे अंबरी
झिम्मा फुगडी खेळू लागल्या
ओल्याचिंब श्रावणसरी….
ऋतूराजाचे नवे सोहळे
आनंद दाटतो अंतरी
चैतन्याचा नाद गुंजतो
स्वप्न पेरती श्रावणसरी…
आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
========
0
4
8
2
8
6



