न्यु मून शाळेत पालक शिक्षक सभेला पालकांचा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बालक ,पालक व शिक्षकांच्या समन्वयाची गरज
न्यु मून शाळेत पालक शिक्षक सभेला पालकांचा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बालक ,पालक व शिक्षकांच्या समन्वयाची गरज
तारका रूखमोडे,जिल्हा प्रतिनिधी
अर्जुनी /मोरगाव: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच पालकांचा शिक्षकांसोबत योग्य समन्वय असणे गरजेचे आहे .शिक्षक, पालक आणि पाल्य हा त्रिकोण साधल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यास फार मोठी मदत होते. हाच हेतू ठेवून न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेज येथे मंगळवारी दिनांक 30 जुलै 2024 रोजी पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी जाणून घेणे, त्यांचे निराकरण करणे तथा पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी कॉलेजमध्ये पालक -शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली .पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी.राकेश उंदिरवाडे, उपाध्यक्ष म्हणून भागवत मुनेश्वर,सचिव सुरज मोटघरे,सहसचिव पुष्पा खोब्रागडे यांची निवड तर प्राथमिक विभागात उपाध्यक्ष गिरिधारी चांदेवार ,सहसचिव चेतना मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .प्रत्येक वर्गाचा प्रतिनिधित्व पालक प्रतिनिधित्व सदस्य म्हणून प्रत्येक वर्गातील एका पालकाची नेमणूक करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून बालक ,पालक व शिक्षकांच्या समन्वयाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते ,परंतु पालकांनीसुद्धा शाळेला सहकार्य करून शाळेविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा ,असे प्रतिपादन संस्थेचे सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी केले. पालकांच्या मनात असलेल्या समस्यांचे निराकरण करून तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय प्रशासन कटिबद्ध असेल ,याची ग्वाही प्राचार्य राकेश उंदीरवाडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या पालकांना येणाऱ्या अभ्यासविषयक अडचणी ,मासिक व सराव परीक्षांचे आयोजन इत्यादी विषयांवर चर्चा करून सर्व ठराव पालकांनी एकमताने पारित करून सभेत मंजुरी दिली. सभेला ८० पालकांची उपस्थिती होती.प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका त्रिवेणी थेर यांनी प्रास्ताविक केले,तर महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. तारका रुखमोडे यांनी सूत्रसंचालन केले .प्रतीक्षा डोंगरवार यांनी आभार मानले. सभेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



